रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत ॲड. तौसिफ चाँद शेख (वय ३२, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

ॲड. तौसिफ शेख आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाचे पदाधिकारी आहेत. सहदेव महंत रामगिरी महाराज (रा. सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेट, जि. नगर) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केली. यातून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यांचे भाषण समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आले, असे ॲड. शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावात रामगिरी महाराजांना प्रवचनासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page