रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला डंपरने चिरडले, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : भरधाव डम्परच्या धडकेनंतर चाकाखाली चिरडली गेल्याने पादचारी तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील कोथरूड बस स्टँडसमोर घडली. तरुणी मोबाइलवर बोलत दुभाजकावरून रस्ता ओलांडत होती. डम्परने तरुणीला धडक दिली. त्यानंतर तरुणी रस्त्यावर फेकली गेली आणि चाक तिच्या अंगावरून गेले. आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे होस्टेल, भेलके नगर, कोथरूड) असे मृत तरुणीचे नाव आहे.
आरती सुरेश मनवाने (वय 23) (रा. एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूड) ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत होती. रस्ता ओलांडताना तिला डंपरची जोरदार धडक बसली. या धडकीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना पोलिसांनी कळवले आहे. तसेच कोथरुड पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




