निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे दिवसीय अधिवेशन संपन्न..!

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ‘गाव तिथे शाखा’ उभारणार – राष्ट्रीय अध्यक्ष यांची घोषणा
पुणे प्रतिनिधी : ज्योतिबा सावंत
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे एकदिवसीय अधिवेशन आणि भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाला. या अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, यावेळी संघटनेच्या राज्यव्यापी विस्ताराचा शुभारंभ पुण्यातून करण्यात आला.
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी गणेश
अधिवेशनात उपस्थित मान्यवरांचा समूह, कचकलवार (राष्ट्रीय अध्यक्ष) होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. यशवंत महाराज फाले, कॅप्टन
परिमल फुलसुंगे, श्री. एस. पी. राठोड, श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज आणि प्रसिद्ध कलाकार क्रांतीनाना मळेगावकर यांसारख्या दिग्गजांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात गणेश कचकलवार यांनी पत्रकारांच्या संरक्षणाबाबत कडक भूमिका मांडली. ते म्हणाले, “पत्रकारांनी कोणत्याही दडपणाखाली न येता निर्भयपणे काम करावे. पत्रकारांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लवकरच मुंबईत
धडक मोर्चा काढला जाईल. तसेच सामाजिक संघ, माहिती अधिकार आणि पोलीस मित्र संघ यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. निर्भय च युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा कमिटीच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा अत्यंत देखणाच यशस्वी झाला.




