गोपाळकृष्ण शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समूहगीत गायन, विद्यार्थी भाषणे,देशभक्तीपर गीतांवर नृत्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान या कार्यक्रमाला माजी पोलीस उपनिरीक्षक काळूराम रेणुसे, समाधान काटे, अजित सावंत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ऐसा देश हैं मेरा, देश रंगीला, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी या देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालकांनी उस्फूर्तपणे भाषण करत शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण आणि दिपाली गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रणजित बोत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका गीतांजली कांबळे व मंदाकिनी बलकवडे यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी मानले. सदर कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




