पुण्यातील कमला नेहरु रूग्णालयात बांगलादेशी घुसले; पोलिसांनी 3 जणांना घेतले ताब्यात

पुणे : पुण्यातील कमला नेहरू रूग्णालयात बांगलादेशी तरुण शिरल्याचा पोलिसांना फोन आला. पोलिसांनी कमला नेहरू रूग्णालयात दाखल होऊन खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. तरूण या रूग्णालयात कसा शिरला याचा तपास सुरू आहे.

Advertisement

आज (दि.14) सकाळी 11 वाजता पोलिसांना एक फोन आला आणि एक संशयित तरुण कमला नेहरू रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात आढलेला संशियत ताब्यात घेण्यात आला आहे. तरुण बिहारचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये तो रक्ताची चाचणी करण्यासाठी आला होता. त्याच्याकडे आधार कार्ड सापडले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

रूग्णालयात आत्तापर्यंत 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या ठिकाणी 4 बांगलादेशी तरुण शिरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यांच्याकडे पोलिसांना बांगलादेशी कागदपत्रे मिळाली आहे. त्यामुळे पोलीस तपास सखोल सुरू आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- संतोष लांडे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page