टॉवरच्या तारांची चोरी करताना पडून मृत्‍यू, साथीदारांनी मित्राला पुरले दुर्गम डोंगरात

वेल्हे : खानापूर रांजणे-पाबे घाट रस्त्यावरील रांजणे (ता. राजगड) येथे दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना खाली पडुन एकजण मृत्युमुखी पडला. या घटनेत मृत्‍युमूखी पडलेल्‍या मित्राला घाटातील पाबे (ता. राजगड) खिंडीतील दुर्गम डोंगरात सोबतच्या दोन साथीदारांनी खड्डा करून त्यात पुरल्‍याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी तरुणाच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

बसवराज मंगळुरे (वय २२, सध्या रा. वडगाव बुद्रुक, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश अरुण येनपुरे (वय २५), सौरभ बापू रेणुसे (वय २५, दोघे रा. पाबे, ता. राजगड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Advertisement

गेल्या महिन्यात १३ जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे व सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे (ता. राजगड) येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी रात्री गेले होते. बसवराज हा टॉवर चढुन लोखंडी ब्लेडने (एक्साब्लेड) ने तारांची वायर कापत होता. त्यावेळी तो खाली पडुन गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. त्यानंतर साथीदार रुपेश व सौरभ याने त्याचा मृतदेह तेथुन पाबे (ता. राजगड) घाटात आणला. घाटातील मंदिरासमोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्यात बसवराज याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- श्रीकृष्ण जाधव

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page