सायकल चोरी करणार्‍या आरोपींकडून 30 सायकल जप्त; वारजे पोलिसांनी कारवाई

पुणे : पुण्यात ‘जॉयराईड’साठी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 30 सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींची नावे शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमधून अनेक सायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद केला होता. याप्रकरणी तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणद्वारे दोन तरुण हे कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली.एका सोसायटी मधून सायकल चोरायची, मजा लुटून ती कुठल्या ही भागात ते ती सायकल सोडून देत नवीन सायकल शोधायचे अशी यांची पद्धत होती. त्यांच्याकडून आत्तापर्यंत लाख रुपये किमतीच्या तब्बल 30 महागड्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

Advertisement

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस कर्मचारीप्रदीप शेलार, मनोज पवार, विजय भुरूक, संभाजी दराडे, विकास पोकळे, अमोल सुतकर, सत्यजित लोंढे यांनी ही कामगिरी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- श्रीकृष्ण जाधव

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page