पुणे : कात्रज घाटात बँक कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

बँक कर्मचाऱ्याने कात्रज घाटात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवी सोनवणे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पुणे : बँक कर्मचाऱ्याने कात्रज घाटात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवी सोनवणे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

रवी एका खासगी बँकेत कामाला होते. ते दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. कात्रज घाटात झाडाला एका तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिासंना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर चिठ्ठी सापडली. चिठ्ठीतील नावावरुन ओळख पटविण्यात आली. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page