मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; वाहनांचं मोठं नुकसान

जळगाव : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांना आदळली आणि अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जळगावात महायुतीच्या वतीने भव्य मेळावा मंगळवारी(ता.13) आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जळगाव विमानतळावर दाखल झाले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळाव्याच्या ठिकाणी जात असतानाच विमानतळ परिसरातच त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा अपघात झाला. या अपघातात ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळली. मात्र,या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळल्यानं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघाताच्या घटनेनंतर पुढे काही वेळातच मुख्यमंत्र्यांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाला.वाहनांच्या ताफ्यातील इतर वाहनांमधून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




