वाहतूक कोंडीची २६ ठिकाणे निश्चित; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून उपाययोजना राबविण्यासाठी नियोजन

पिंपरी : पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील काही ठिकाणी होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नियोजन केले आहे. यासाठी पोलिसांकडून वाहतूक कोंडीची २६ ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्हर्च्युअल टाऊन हॉल मिटींग या उपक्रमात स्पष्ट केले.

नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून बुधवारी हे संवाद सत्र आयोजित केले होते. यावेळी नागरिकांनी सततच्या वाहतूक कोंडीबाबतचे प्रश्न विचारले. त्याबाबत आयुक्तांनी सांगितले की, वाहतूक शाखा, महापालिका, सार्वजनिक वाहतूक विभाग, एनएचएआय यांनी संयुक्तपणे २६ वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित केले आहेत. त्यावर उपाययोजना व अंमलबजावणी सुरू आहे. चाकणमध्ये तळेगाव चौक व आळंदी फाटा यासह ११ ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे सांगितले.

Advertisement

तसेच हिंजवडीत, विप्रो सर्कल आणि राधा चौक यासारख्या प्रमुख भागांचा आढावा घेतला जात आहे आणि रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियमन उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ही आहेत कोंडीची ठिकाणे

मुकाई चौक, गोडाउन चौक, फिनोलेक्स चौक, भारतमाता चौक, खंडोबा माळ चौक, बोराटे वस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, नाशिक फाटा, लक्ष्मी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी चौक, भुजबळ चौक, ताथवडे भुयारी मार्ग, काळाखडक रोड जंक्शन, तळवडे चौक, भूमकर चौक, फोनिक्स मॉल एरिया, काशीद पार्क, भोसरी बस स्टॅन्ड, पुनावळे भुयारी पूल, चिखली चौक, देहू फाटा, टिळक चौक जंक्शन, दापोडी मेट्रो स्टेशन, गणेशनगर चौक, डांगे चौक

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page