मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदा असणार ‘असा’ बदल

पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात घेतल्या जातात. यार परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसंच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.

Advertisement

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसंच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचाविचार करता येत्या 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा विचार आहे. लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page