आरक्षणाच्या वादावर शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले; मुख्यमंत्र्यांनी आता…

पुणे : मराठा आरक्षणासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडावी अशी मागणी राज्यातील मराठा संघटनांकडून केली जात आहे. कालही सोलापूर दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आजही मराठा क्रांती ठोक मोर्चाने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, “राज्यातील वातावरण सध्या बिघडलं आहे. त्यामुळे आपण आत्ता काळजी घेतली नाही तर पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आपल्यासमोर कोणते पर्याय आहेत? याचा विचार करायला हवा. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अलीकडेच भेटलो. आमच्यात आरक्षणाविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी त्यांना काही गोष्टी सुचवल्या आहेत.

Advertisement

“मला असं वाटतं, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. त्या बैठकीला त्यांनी सरकारमधील काही नेत्यांना निमंत्रित करावं. विरोधी पक्षांच्या वतीने आम्ही त्या बैठकीला हजर राहू. तसेच सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी जे निर्णय घेईल त्यात आमची देखील सहकार्याची भूमिका राहील.”

पुढे बोलतांना पवार म्हणाले, आमची अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ही बैठक बोलवावी. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांना, त्या पक्षांच्या प्रमुखांना त्यांनी बोलवावं. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणारे मनोज जरांगे पाटील यांनाही त्या बैठकीला निमंत्रित करावं. तसेच ओबीसींचं नेतृत्व करणारे लोक त्या बैठकीला असायला हवेत. छगन भुजबळ व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना या बैठकीला निमंत्रित करावं. त्या संयुक्त बैठकीत आपण आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करू आणि मार्ग काढू.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page