पुर्व वैमनस्यातुन केलेल्या खुनातील तीन विधीसंघर्षीत बालकांना ०२ तासांच्या आत घेतले ताब्यात..!

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील गु.र.नं १०३/२०२६, भा.न्या.सं.क. ६१ (२) (अ),१०३(१),३ (५), आर्म अॅक्ट. क ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ या गुन्ह्याचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तीन संशयित इसमांचे चेहरे दिसल्याने सदर फोटो ओळखीचे सर्व बातमीदार यांना पाठविले असता पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, आपण पाठविलेल्या फोटोमधील तीन संशयित इसम हे वनदेवी वनउद्यान, श्रमिक वसाहतीच्या शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे थांबले आहेत व त्यांनी काहीतरी गैरकृत्य केल्याचे त्यांचे हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

Advertisement

सदरची बातमीची खात्री करणेकरिता स्टाफने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता संशयित इसम पोलीसांची चाहुल लागताच पळुन जावु लागल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता विधीसंघर्षग्रस्त ०३ बालकांनी मिळून मयत इसम नामे करण गिरिष काशिद वय-१९ वर्षे रा. सनराईज अव्हेन्यु, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी पुणे यास पुर्व वैमनस्यातुन एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून दि.१६/०३/२०२६ रोजी सायंकाळी १७/१५ वा. चे दरम्यान सार्थक बंगला, अरविंद सोसायटी, मारुती मंदिराजवळ, आनंदनगर पुणे, येथे धारदार शस्त्राने व दगडाने मारून खुन केल्याचे सांगितले. सदर तीन विधीसंघर्षग्रस्त बालके यांना पुढील कारवाईकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार अजित शिंदे, प्रदिप राठोड, साईकुमार कारके, अमित गद्रे, महेश पाटील, रविंद्र लोखंडे, बाळु गायकवाड, शिवाजी सातपुते तसेच महिला पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, विद्या प-हाड यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page