जुन्या वादातून हॉटेल चालकावर तलवारीने वार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, गेल्या काही दिवसाखाली वनराज आंदेकर यांचा खून झाला. आा पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यात जुन्या वादातून एका चायनीज हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. तर, जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन गेल्याची घटना घडली आहे. याघटनेत हॉटेल चालक गंभीर जखमी झाले आहेत.

असिम जावेद सय्यद असे हल्लात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहेत. याप्रकरणी जावेद अहमद सय्यद (वय ५६, रा. गोल्फ क्लब रोड, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार मोबीन शेख व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. येरवडा इराणी मार्केट जवळ पक्को चायनीज हॉटेल येथे घडली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद सय्यद आणि ओरीपी यांच्यात रमझान महिन्यात वाद झाला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मोबीने सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास जावेद यांचा मुलगा असिम हा हॉटेलमध्ये असताना आला. त्याने असिमवर तलवारीने वार केला. यात असिमच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. नंतर दोघा आरोपींनी गल्ल्यातील ६ ते ७ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. यानंतर देखील या आरोपींनी फोनद्वारे शिवीगाळ करत जावेद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक खेडकर करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page