सायरन वाजवत निघालेल्या शिवसेनेच्या आमदाराला पुणेकराने सुनावलं, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे : शिवसेना आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत कार चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावेळी एका पुणेकराने गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसले होते. यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली व ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला.

Advertisement

यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे फक्त पाहतच राहिले. त्याचबरोबर आमदार दराडे यांना पुणेकराने खडेबोल सुनावले. आम्ही जनता निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. पोलिसांकडे पाहू नका असही या पुणेकराने आमदार दराडे यांना सुनावलं. आमदार किशोर दराडे हा सर्व प्रकार पाहत होते. हा व्हिडओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page