पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, तपास सीआयडीकडे

पुणे : पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका 47 वर्षीय आरोपीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. अटक केल्यानंतर आजारी पडल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सचिन अशोक गायकवाड (वय 47) असे मृत्यू झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याघटनेने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गायकवाड व मनोहर रमेश माने (वय ३६, रा. मुंढवा) यांना पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास अटक केली होती. अटकेनंतर नियमानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्यांना विश्रामबाग येथील सर्वसाधारण लॉकअपमध्ये ठेवले होते. त्यांना ८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ८ ऑगस्ट रोजीचा तपास पुर्ण केल्यानंतर रात्री पुन्हा विश्रामबाग येथील जनरल कोठडीत ठेवले.

Advertisement

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली. त्यामुळे तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याला सेलेब्रल हॅमरेजचा त्रास असल्याचेही निदान झाले. त्यामुळे दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रात्री साडे सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तत्पुर्वी पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडी मिळविली होती. दरम्यान, आरोपी सचिन गायकवाड याच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. त्याचा पूर्व वैद्यकीय इतिहास आहे व घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती नातेवाईकांना माहित असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी सीआयडीकडे वर्ग केला आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page