हरवलेले अन् चोरीला गेलेले 51 मोबाईल नागरिकांना केले परत; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पुणे – रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन चोरी झालेल्या तब्बल ५१ मोबाईलचा शोध बंडगार्डन पोलिसांकडून लावण्यात आला आहे. ऑनलाईन वेबसाईटवर प्राप्त तक्रारीवरून पुणे पोलिसांनी प्रभावी तपास केला आहे. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील यांच्या हस्ते 51 हस्तगत मोबाईल तक्रारदाराना सुपूर्द करण्यात आले.
बंडगार्डन पोलिसांच्या सायबर कक्षाकडे मोबाईल चोरीला व गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रिंवद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ सागर घोरपडे, निलेश पालवे यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइलची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाइल हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय नंबर, लोकेशन ट्रेस करण्यासह इतर तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे ५१ मोबाइल शोधले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




