विनापरवानगी झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतरही मंत्री उपस्थित होते. यामध्ये वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या दंडात्मक तरतूद करण्याचा शासन निर्णय लवकरच पारित केला जाईल.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




