महिलांसाठी खुशखबर ! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला येणार

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला. जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये अर्थसहाय्य मिळणार आहेत. सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 19 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाचवेळी योजनेचे पैसे जमा होतील.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page