पहाटेच्या वेळेस रिक्षामधून येवून मोबाईल चोरी करणारे दोघे ताव्यात. तिन मोबाईल व रिक्षा असा किं. रू ३ लाखाचा माल जप्त..!

फिर्यादी हे दिनांक २७/०४/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वा.चे सुमारास हडपसरच्या दिशेने कामानिमीत्त चालत जात असताना फोनवर बोलत जात असताना ससाणे नगर कडुन हडपसरच्या दिशेने येणाऱ्या काळया रंगाच्या रिक्षातील मागे बसलेल्या एका इसमाने फिर्यादी यांचा मोबाईल खेचून जोरात हडपसरच्या दिशेने निघुन गेले. फिर्यादी यांचे सारखेच इतर २ इसम यांचे देखील मोबाईल चोरी गेल्याने त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं ४१५/२०२५ भा. न्या. सं.३०४,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संजय मोगले, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार अमित साखरे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथक काम करीत असताना, त्यांनी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहीले. प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व त्याआधारे मिळालेली उपयुक्त माहीती याचे आधारे रेकॉर्ड वरिल आरोपी नामे १) विजय ऊर्फ खंडया खंडु सरोदे वय १९ वर्षे रा. ढोरे पेट्रोल पंपाच्या समोर, हरपळे वस्ती, फुरसुंगी पुणे व १ विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून किं. रू ५०,०००/-चे तिन मोबाईल फोन व गुन्हा करताना वापर केलेली रिक्षा असा किं. रू ३,००,०००/- असा माल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली रिक्षा ही चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं ७५/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिपक कांबळे हे करीत आहेत.

आरोपी विजय ऊर्फ खंडया खंडु सरोदे याचेकडून खालील गुन्हे उघडकीस / पाहीजे आरोपी आहे. १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४१५/२०२५ भा. न्या. सं.३०४,३ (५) (गुन्हा उघडकीस)

२) फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं ७५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) (गुन्हा उघडकीस)

३) फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं १७५९/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०५,३३१, (३) (४) (पाहीजे आरोपी )

४) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं ५४३/२०२४ भा. न्या. संहिता कलम ३०३ (२) (पाहीजे आरोपी)

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पो. अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page