मुख्यमंत्री शिंदे आज पुणे दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचत आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत.

Advertisement

एकनाथ शिंदे हे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सोमवार, 5 ऑगस्ट रोजी पुण्याला जाणार आहेत. राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणातील पाणी 65 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यात लष्कराच्या दोन तुकड्या तैनात असून एक तुकडी स्टँडबायवर आहे. याशिवाय पीएमसी, फायर ब्रिगेड, एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page