लॉरेन्सचा एन्काउंटर करणाऱ्याला बक्षीस देणार; करणी सेनेच्या घोषणेने खळबळ

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईची दहशत मुंबईमध्येही पसरू लागल्याचे दिसू लागले आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी बिश्नोईच्या सांगण्यावरून अभिनेता सलमान खान याच्या इमारतीबाहेर गोळीबार करण्यात आला होता. बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे. अशातचं आता करणी सेनेच्या एका नेत्याने हे बक्षीस जाहीर केले आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी बिश्नोईला एन्काउंटरमध्ये ठार मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

काय म्हणाले राज शेखावत ?

Advertisement

क्षत्रिय करणी सेनेच राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओद्वारे बिश्नोईच्या एन्काऊंटरवर बक्षिसाची घोषणा केली होती. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये दिले जातील. शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोईद्वारे करण्यात आली होती. जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करेल त्याला करणी सेना ही 1 कोटींची रक्कम देईल, असे राज शेखावत यांनी या व्हिडीमध्ये नमूद केले. एवढेच नव्हे तर त्या शूर पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page