सेल्फीचा मोह पडला महागात; पुण्यातील तरुणी 100 फूट दरीत पडली

सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सेल्फी काढत असताना एक मुलगी 100 फूट खोल खड्ड्यात पडली. लोकांना याची माहिती मिळताच तातडीने होमगार्डसह बचावकार्य सुरू करण्यात आले आणि अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर दोरीच्या साहाय्याने कसेबसे मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले. नसरीन कुरेशी असे या २९ वर्षीय तरुणीचे नाव असून, ती पुण्यातील रहिवासी आहे.

३ ऑगस्ट रोजी पावसातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नसरीन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ठोसेघर धबधब्यावर फिरायला गेली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा बंद असल्याने नसरीन आणि तिच्या ग्रुपने मागे परतण्याचा निर्णय घेतला. धबधबा बंद असल्याने निसर्ग पर्यटनाची निराशा झाली होती, पण परतीच्या प्रवासादरम्यान तोच आनंद घेण्यासाठी या मित्रांच्या ग्रुपने बोरणे घाटात गाडी थांबवली. सर्वजण पावसाचा आनंद घेत फोटो काढू लागले. हिरवागार निसर्ग पाहून नसरीनलाही सेल्फी फोटो काढावा वाटला. नसरीन सेल्फी फोटो काढत होती. मात्र, तेवढ्यात पावसाच्या संततधारेमुळे ओलीव झालेल्या येथील घाटाच्या कठाडावरुन नसरीनचा पाय घसरला. आणि पाय घसरुन नसरीन 100 फूट दरीत कोसळली.

Advertisement

खोल दरीत कोसळून नसरीन थोडक्यात बचावली. एका झाडाचा आधार घेऊन ती कशी बशी जीव मुठीत धरुन होती. नसरीनच्या मित्रांनी स्थानिक पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिसांनी तात्काळ बचावकार्यासाठी होमगार्ड आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या टीमला माहिती दिली. त्यानंतर, पोलीस, ट्रेकर्स आणि होमगार्डच्या टीमने तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरू केले.

होमगार्ड अविनाश मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले. या दुर्घेटनेत नसरीन गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page