हिंजवडीमधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार; रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

पुणे : गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही नवीन आयटी कंपनी आजूबाजूच्या एमआयडीसीत आणलेली नाही. उलट अनेक कंपन्या परराज्यात निघून गेल्या आहेत. टाटा सारख्या इतरही कंपन्या परराज्यात घेऊन जाण्याची तयारी हे सत्ताधारी करत असल्याचा आरोप रोेहित पवार यांनी केला आहे. या सत्ताधाऱ्यांना केवळ गुजरातचा विकास करायचा आहे. आता आयटी हब हिंजवडी मधील ३२ कंपन्या गुजरातला जाणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ चिंचवड येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

Advertisement

रोहित पवार म्हणाले की, विरोधकांना त्यांचं साम्राज्य जपायचं आहे. पिंपरी- चिंचवड परिसरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मोठमोठ्या कंपन्या आणल्या. शरद पवार यांनी चालना दिली. सगळ्यात मोठ आयटी पार्क देखील आपल्याच शेजारी आहे. याचा देखील फायदा या शहरातील नागरिकांना झाला. पिंपरी- चिंचवड मध्ये अवघा महाराष्ट्र वसलेला आहे. शहरातील याच नागरिकांना भाजपने दाबण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार आणि राजकारण हेच या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केला. “गुजरातला ३२ आयटी कंपन्या जाणार आहेत. तीन लाख नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. या सत्ताधाऱ्यांना केवळ गुजरातचा विकास करायचा आहे. या ठिकाणचे टाटा सारखे मोठे प्रकल्प देखील गुजरातला घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दहा वर्षात एकही आयटी कंपनी नवीन आलेली नाही. उलट अनेक कंपन्या गेल्या आहेत. असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page