मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 17 मोबाईल केले हस्तगत

पाटण : नागरिकांचे गहाळ आणि चोरीला गेलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे 17 मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणे कामी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफ ने सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ व चोरी झालेले एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे यांनी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page