येणाऱ्या दोन-तीन दिवसांतच…; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

जालना : राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा तिढा गंभीर स्वरूप घेताना चे चित्र असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून प्रवीण दरेकरांनी 12 ते 13 संघटना जमा केल्या, असा आरोप जरंगे यांनी केला. मराठ्यांचा विरोधात उगाच बोंबलायचं असं त्यांना सांगितलं असं म्हणत जरांगे यांनी दरेकरांवर निशाणा साधला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठ्यांची यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांनी काही दुखी आत्म्यांना सोबत घेतले आहे. ते अडचणीत आले आहेत. काय करावे हे त्यांना सुचत नाही. आमचे लोक गोळा करून फडणवीस आम्हाला संपण्याचे प्रयत्न करत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन हे फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय होत नाही. या वेळेस सरकारने नवीन डाव खेळला आहे. मराठा आंदोलकांना पुढे करायचे आणि मागे ओबीसी उभे करून मराठ्यांचा आंदोलन चिघळले असे दाखवून मराठा बदनाम करायचा, असे त्यांचे षडयंत्र आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्च करणारे दरेकर आहेत. तुमच्या खांद्यावर फडणवीस आणि दरेकर बंदूक ठेवत आहेत. तुम्हाला त्यांच्या दरात जाण्याची गरज काय, त्यांना तुमच्या दरात येऊ द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
१३ संघटना जमा केल्या
फडणवीस यांच्या सांगण्यावरुन प्रवीण दरेकर यांनी १३ संघटना जमा केल्या आहेत. त्या लोकांची बैठका कुठे झाल्या? बैठकीत कोण होते? डोंबिवली आणि मलाबर हीलमधील बैठकीत काय झाले? ही सर्व माहिती दोन, तीन दिवसांत माझ्याकडे येणार आहे. मग आपण या सर्व गोष्टी उघड करणार आहोत. फडणवीस तुम्हालाही शॉक बसेल की आपली माहिती मनोज जरांगे यांच्याकडे कशी जात आहे. परंतु या सर्व गोष्टीवरुन पडदा लवकरच उठणार आहे. असं जरांगे पाटील म्हणाले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




