हडपसर व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करणारा सराईत वाहन चोर जेरबंद..!

दिनांक २०/०५/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने सराईत वाहनचोर आकाश वाघरी त्याचेकडील विना नंबर प्लेटच्या चोरीच्या मोटार सायकलवरून सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ, पुनावाला चौक, मांजरी हडपसर रोड, पुणे येथे थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी तपास करुन आकाश सुरेश वाघरी, वय २३ वर्षे, सध्या रा. तायम्मा मंदिराच्या बाजुला, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे यास वरील वर्णनाच्या चोरीच्या मोटारसह पकडले.

त्याचेकडे सदर गाडी बाबत अधिक तपास केला असता त्याने सदरची होंडा शाईन मोटर सायकल ही मगरपटटा, हडपसर, पुणे येथुन १५ ते २० दिवसांपुर्वी चोरी केल्याचे सांगितले. सदरची मोटार सायकल विना नंबर प्लेट असल्याने तिचे चॅसिस नंबर व इंजिन नंबरची पाहणी केली असता त्यावरुन नमूद मोटार सायकलचा नंबर प्राप्त केला असता तिचा क्र. एम.एच.१२ पी.एफ. ६३८७ असल्याचे दिसून आले. सदर मोटार सायकलच्या मालकाचा तपास केला असता दिनांक २७/०४/२०२५ रोजी सदरची गाडी ही टेस्टी पंजाब हॉटेल, मगरपटटा, हडपसर, येथुन चोरीस गेली असल्याबाबत समजले. सदर मोटर सायकल बाबत हडपसर पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नंबर ४३१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक ०१/०५/२०२५ रोजी गुन्हा नोंद होता.

Advertisement

त्यानंतर आरोपी आकाश याच्याकडे अधिक तपास केला असता, अंदाजे १५ ते २० दिवसांपूर्वी तो व त्याचा मित्र यांनी अजुन एक होंडा शाईन मोटार सायकल लोणी काळभोर टोल नाक्याजवळ, पुणे-सोलापूर हायवे येथून चोरी केली असून ती मोटार सायकल तिथेच बाजुला लावलेली असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तेथे जावुन खात्री केली असता सदरची होंडा शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच.१२ एन.आर.०९९४ ही सदर ठिकाणी मिळुन आली. तिचे रजिस्ट्रेशन पाहुन मालकाबाबत माहिती काढली असता, दिनांक २७/०४/२०२५ रोजी सदरची गाडी ही कदमवाकवस्ती लोणीकाळभोर येथुन चोरीस गेली असल्याबाबत समजले. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर २२३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद होता. याप्रमाणे सराईत वाहनचोर आकाश सुरेश वाघरी, वय २३ वर्षे, सध्या रा. प्लॉट नं. ११, तायम्मा मंदिराच्या बाजुला, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे याच्याकडुन ४०,०००/- रुपये किंमतीच्या ०२ होंडा शाईन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. आरोपी यास हडपसर पोलीस स्टेशन याच्या ताब्यात दिले असुन तो जेल मध्ये आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त प्रशासन, अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. संजय पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, विशाल भिलारे, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौदर, चेतन शिरोळकर, मंगेश गुंड, गणेश माने, अक्षय गायकवाड, उमेश मठपती, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page