मराठा आरक्षणावर पवारांची भूमिका काय ?; पंकजा मुंडेंचा सवाल

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचाव यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरु केली आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणांनी महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरुन पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे.

पंकजा मुंडे क्य म्हणाल्या?

Advertisement

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय?” असा सवाल पंकजा मुंडेंनी शरद पवारांना विचारला आहे. हा सवाल विचारतानाच पंकजा मुंडेंनी, “शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,” असंही त्या म्हणाल्या आहेत.

आरक्षणाबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

“आरक्षणाच्या मुद्यावरून दुर्दैवाने आज राज्यात दोन वेगळे गट पडले आहेत. त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्याकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकाची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे”, असं शरद पवार म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page