‘आनंददायी उपक्रमांचे झाड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ अनावरण

पुणे : गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांच्या ‘ आनंददायी उपक्रमांचे झाड ‘ या पुस्तकाचा मुखपृष्ठ अनावरण सोहळा सर दोराबजी टाटा असेम्ब्ली हॉल, नौरोजी वाडिया कॉलेज येथे पार पडला. मुंबई शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार, शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचे शुभहस्ते पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे कौतुक केले.

शाळेत विद्यार्थ्यांकरीता आजतागायत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण उपक्रम, नवोपक्रमांची माहिती ‘ आनंददायी उपक्रमांचे झाड ‘ या पुस्तकामध्ये असल्याचे उपक्रमशील शिक्षक, लेखक रणजित बोत्रे यांनी सांगितले. मुख्याध्यापिका जयश्री कासार यांचे याकरिता मार्गदर्शन लाभले.

Advertisement

यावेळी माजी शिक्षण संचालक गंगाधर मम्हाणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप, प्रादेशिक सचिव डॉ. संजय नायडू, अजित चव्हाण, मुरलीधर मोरे, हरिश्चंद्र गायकवाड, नारायण शिंदे, जितेंद्र पायगुडे, बाळासाहेब पवार, सुनील जाधव, निता गुंजिकर, चित्रकार सारंग फराटे यासह पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page