भाजपाची 288 जागांवर लढण्याची तयारी, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला, त्यात भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाजपने विधानसभेची तयारी आणि रणनिती आखायला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी जागा लढवण्याबाबत मोठं विधान केलं आहे.
भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी महायुतीत लढण्याचा ठाम निर्णय आहे असंही स्पष्ट केलं. महायुतीत जेवढ्या जागा मिळतील त्या लढवू, पण तयारी 288 जागांची आहे असं ते म्हणाले आहेत. उरलेल्या जागांची तयारी सहयोगी पक्षांसाठी वापरू असंही त्यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




