शपथविधीनंतर सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेमध्ये या सर्व आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

Advertisement

आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणा गोविद्यांना राहिला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असे सदाभाऊ खोत म्हणाले.

कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते, सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी. यातून मार्ग निघेल. मी ऊसाचं, दुधाचं, सोयाबीनच आंदोलन केलं, कळवा जेलमध्ये गेलो, येरवाड्यात गेलो, लाठ्या काठ्या खाल्या. पण आंदोलन कुठं थांबवायचं हे जर समजलं तर ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो असे सदाभाऊ खोत म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page