संत श्री तुकाराम महाराज / संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थान आषाढी वारी पालखी सोहळा (दिनांक २०/०६/२०२५ ते २३/०६/२०२५)

२३/६/२०२५ वरम्यान आगमन, मुक्काम व प्रस्थान असा होणार आहे. आषाढी वारी पालखी सोहळा हा ऐतिहासिक परंपरा असून शहरात हा सर्वाधिक लोकप्रिय सोहळा बनला आहे. त्यामुळे पुणे शहर व राज्यातील तसेच परदेशातील पर्यटक सदरचा सोहळा पाहण्याकरीता व अभ्यास करण्याकरीता येत असतात. अत्यंत मनोभावे साजरा होणारा हा सोहळा आहे. सदर पालखी महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संतांची असल्याने पालखीबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक करून सर्व भागातील वारकरी या पालखी सोहळ्यात भाग घेण्यासाठी येतात. वारकरी पालखीचे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटपर्यंत सोबत असतात. पालखी जसजशी पुढे जाते तसतशी वारक-यांची संख्या वाढत जाते. त्याशिवाय पालखीच्या पुढे आणि मागे ब-याच दिंड्या असतात. प्रत्येक पालखी बरोबर मोठा जनसमुदाय असतो. सदर पालखीशी लाखो भाविक लोकांच्या भावना निगडीत असलेने कोणत्याही परिस्थितीत या पालखीचे आगमनाचे व मुक्कामाचे ठिकाणी तसेच मार्गक्रमणाचे वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ➤ दि.२०/०६/२०२५ रोजी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे शहर आयुक्तालयातील बोपखेल याठिकाणी आगमन होईल तेथून फुलेनगर येथे दुपारचे भोजन व विसावा नंतर संगमवाडी येथे विसावा घेवुन पालखी श्री पालखी विठोबा मंदीर, भवानी पेठ पुणे येथे मुक्काचे विकाणी आगमन होईल. (एकुण मार्ग १६ कि.मी) > वि. २०/६/२०२५ रोजी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहर आयुक्तालयातील हॅरिस ब्रिज खडकी याठिकाणी आगमन तेथून तुकाराम पादुका चौकात विश्रांती घेवून पालखी श्री. निवडुंग्या विठोचा मंदीर नाना पेठ पुणे येथे मुक्काचे टिकाणी आगमन होईल. (एकूण मार्ग ११ कि.मी) ➤ दि.२१/०६/२०२५ रोजी दोन्ही पालखी पुणे शहरात मुक्कामी राहतील. ➤ दि.२२/०६/२०२५ रोजी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामाचे टिकाणाहून निघुन हडपसर गाडीतक, उरुळी देवाची, वडकीनाला येथे विसावा घेवून दिवे घाट मार्गे सासवड (पुणे ग्रामिण हद्द) कडे मुक्कामी जाईल. (एकूण मार्ग २१ किमी) ➤ दि.२२/०६/२०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामाचे ठिकाणाहून निघुन हडपसर गाडीतळ येथे विसावा घेवून कदमवाक बस्ती नवीन पालखी तळ. लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी जाईल. (एकूण मार्ग १६ कि.मी) > वि.२३/०६/२०२५ रोजी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामाचे ठिकाणाहून निघून नामगाव फाटा मार्गे यबल (पुणे ग्रामिण हद्द) कडे मुक्कामी जाईल. (एकूण मार्ग ०२ कि.मी) > आषाढी वारी पालखी सोहळा बंदोबस्त दरम्यान कोठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही भाविकांना तसेच नागरिकांना असुविधा होणार नाही. भाविकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही पालखी सोहळा बंदोबस्ताची उद्दिष्टये निश्चित करण्यात आलेली आहेत.

Advertisement

> महिलांची सुरक्षितता, चेन स्नॅचिंग, पीक पॉकेटींग या सारखे घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे शाखा व तपास पथकांच्या विशेष टिम नेमण्यात आलेल्या आहेत. ▶ संपूर्ण पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) व श्वान पथकाकडून संपूर्ण घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे. > गर्दीच्या ठिकाणी व महत्वाचे ठिकाणी जलद प्रतिसाद पथके (QRT) तैनात करण्यात आली आहे. > गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखीचे Live Location ची लिक पुणे शहर पोलीसाकडून नागरीकांसाठी वेब पेज व समाज माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. > पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थान दरम्यान पुणे शहरांतील कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. कोणत्या बाजुने व कोणत्या मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे. याबाबत माहीतीची लिंक सुध्या नागरीकांसाठी व समाज माध्यमांवर वाहतुक विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. > नागरीकाचे सुविधेसाठी पालखी मार्गावर, विसाया, तसेच मुक्कामाचे ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. > पालखी सोहळयाचे नियोजन नियोजन योग्य प्रकारे होणेसाठी शासनाचे सर्व सबंधित ठिकाणी पी.डब्ल्यू.डी. मनपा, महावितरण, मेट्रो. अग्निशामक विभाग यांचेशी समन्वय बैठक घेण्यात आली आहे. ➤ श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त यांचेसोबत बैटक घेवुन समन्वय साधण्यात आला आहे. > गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी टिकठिकाणी बॅरिकेटींग करुन घेण्यात आले आहे. > पालखी मार्ग, विसावा, तसेच मुक्कामाचे टिकाणी येथे प्रभावी सीसीटीव्ही यंत्रण कार्यान्वीत करण्यात आली आहे > संत श्री. तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन, मुक्काम व प्रस्थानकरिता लावण्यात आलेला एकूण बंदोबस्त

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page