गाड्या फोडायच्यात तर पवार, ठाकरे, फडणवीसांच्या फोडा; प्रकाश आंबेडकरांचं अजब वक्तव्य

परभणी : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजबच विधान केल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर कालपासून परभणी जिल्ह्याच्या विविध भागात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने सभा घेत आहेत. आज गंगाखेड येथे आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आंबेडकरांनी चक्क शरद पवार देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय?, तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




