विनापरवाना बेकायदेशीररित्या औषधांची नशेकरीता विक्री करणा-या आरोपीस केले जेरबंद

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दि.१६/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थविरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार निशिकांत सावंत यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी नामे मुकेश भुरामजी शिरवी, वय २८ वर्ष रा. सरस्वती सोसायटी, फ्लॅट नं.४, ताडीवाला रोड, पुणे हा विना परवाना बेकायदेशिररित्या Dicyclomine Hydrochloride, Tramadol, Hydrochloride & Acetaminophen Capsules या औषधांची लोकांना नशेकरीता विक्री करीत आहे.
सदरबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पथकाने अन्न व औषध विभाग, पुणे कडील अन्न व औषधे निरीक्षक श्री विवेक खेडकर व श्रीमती श्रुतीका जाधव यांचेसह सरस्वती सोसायटी, फ्लॅट नं.४, ताडीवाला रोड, पुणे येथे छापा टाकला असता आरोपी नामे मुकेश भुरामजी शिरवी, वय अंदाजे २८ वर्ष याचे घरामध्ये रू.६८३२८/- किं. चे Dicyclomine Hydrochloride, Tramadol, Hydrochloride & Acetaminophen Capsules या औषधांचे एकुण ७३ बॉक्स त्यामध्ये १०,५१२ कॅप्सुल्स मिळून आल्या आहेत. अशा प्रकारे आरोपीकडून एकुण ५२५.०६ ग्रॅम (Commercial Quantity) Tramadol हा प्रतिबंधीत अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत. सदरबाबत बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे येथे गु.र.नं.१५१/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चेकलम ८ (क) सह २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त श्री गौहर हसन, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे ३ शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा.पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार आशा भिंगारे, विजय कांबळे, विशाल भिलारे, सचिन लोहार, निशिकांत सावंत, अतुल क्षिरसागर, जानव्ही सुर्यवंशी व अक्षय शिर्के यांचे पथकाने केली.




