अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या संचालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे : शासकीय अनुदानाची फाईल शिक्षण विभागाकडे पाठवयाची असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपये तसेच त्यानंतर पुढे निवृत्त होईपर्यंत दरमहा पगाराच्या दहा टक्के रक्कम ही संस्थेस द्यावी लागेल, अशी मागणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे करणाऱ्या कात्रज येथील स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या संचालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३५ वर्षीय शिक्षकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे संचालक अशोकलाल अंबदचंद मुनोत, निखिल अशोकलाल मुनोत, उल्का शशिकांत नवगिरे, सुरेखा महादेव सुतार, हर्षदा अशोकलाल मुनोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

वेतनातून परस्पर रक्कम कपातीचा प्रकार ८ मार्च २०२३ पासून सुरु होता. यापूर्वी अशोकलाल मुनोत, निखिल मुनोत आणि सुरेखा सुतार यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षक, त्यांचे सहकारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावूनशासकीय अनुदानाची फाईल शिक्षण विभागाकडे पाठवायची असेल तर प्रत्येकी ५ हजार रुपये मागितले. निवृत्त होईपर्यंत दरमहा पगारातून दहा टक्के रक्कम संस्थेस द्यावी लागेल, असे अशोकलाल मुनोत यांनी सांगितले. वर्षभरात सुमारे सात लाख रुपये शिक्षक, शिक्षकेतर वेतनातून कापून घेतले. तक्रारदार शिक्षकाने रक्कम देण्यास नकार दिल्यावर त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली, तसेच अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक व शारीरिक छळ केला, असे तक्रारीत म्हंटले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- भूमसिंग राठोड

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page