काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येणारच, नाना पटोले यांच वक्तव्य…
महाराष्ट्र विधानसभेसाठीचं मतदान सहा वाजता संपलं आहे. आता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोल्समध्ये कुणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज एक्सने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महायुतीला १४५ ते १५५ जागा मिळतील अशी शक्यता आहे. आणखी एक्झिट पोल्स काय काय अंदाज वर्तवतात? ते कुणाच्या बाजूने असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो. जाणून घेऊ सगळे अपडेट्स एका क्लिकवर.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार येणार आहे असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस व्होट जिहाद म्हणतात, मग ब्राह्मणांनी भाजपाला मतदान केलं तर आम्ही काय त्याला ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचं का? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




