रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

बुलढाणा : शेतकरी चळवळीतील युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. रविकांत तुपकर यांनी प्रमुख नेते राजू शेट्टी यांच्यावर मोठे आरोप केले होते. त्या आरोपावर तसेच रविकांत तुपकर यांच्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. त्यातच आज समितीने पत्रकार परिषद घेऊन रविकांत तुपकर यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

तुपकर यांना अनेकदा संधी देऊनही ते आमच्या शिस्तपालन समितीसमोर हजर झालेले नाही. उलट ते शेट्टी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या तीन ऊस परिषदेलाही ते गैरहजर राहिले आहेत. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून कोणताही संबंध राहिलेला नाही. असं आम्ही शिस्त पालन समितीच्या वतीने जाहिर करतो. तुपकर यांनी शेतकरी संघटनेत खूप काम केलेलं असल्याने आम्ही त्यांच्याबाबत हकालपट्टी हा शब्द प्रयोग करणार नाही, असं पत्रकार परिषदेत शिस्तपालन समितीने स्पष्ट केले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page