फडणवीसांच्या खास माणसाकडून ठाकरें-पवारांना अडकवण्यासाठी ऑफर; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

मुंबई : मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं.. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल ददेशमुख काय म्हणाले?

तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला ही ऑफर दिली होती. या ऑफर सदंर्भातील सर्व भक्कम पुरावे माझ्याकडे असून, मी योग्य वेळी ते समोर आणेन, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Advertisement

महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे उद्धव ठाकरे यांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. पण मी तो आरोप केला नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालीयनवर बलात्कार करून तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप करण्यासाठी दबाव टाकला गेला, अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यासा सांगितले गेले. पण मी तेही करण्यास नकार दिला.

इतकेच नव्हे तर, अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधींची कमाई करून देण्यास सांगितले, असा जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, आणि 100 कोटींच्या वसुली प्रकरणातून सुटका मिळवा, अशीही ऑफर देण्यात आली, पण मी हे सर्व कऱण्यास नकार दिल्यानेच मला 13 महिने तुरुंगात राहावे लागले, असा दावा देशमुख यांनी केला.

जन हक्क टाइम्स पुणे वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page