खुनाचा प्रयत्न करणा-या गुन्हयातील आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा..!

हडपसर पोलीस ठाणे गुरनं ७५३/२०१८ भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हातील आरोपी अमोल बाळसाहेब बोरकर वय ३३ वर्षे रा. काळे कॉम्पलेक्स बिल्डींग काळेपडळ पुणे व सागर विजय काळे वय ३३ वर्षे रा. सदर यांनी संशयावरुन इसम प्रतिक सकपाळ यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारधार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता.

दाखल गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री दिलीप गाडे तात्कालीन नेमणुक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर (सध्या नेमणुक लातुर ग्रामिण) यांनी केला असुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याचा सेशन केस नंबर ६५३/२०१८ असा असुन सदर केस मा.एस आर अग्रवाल साो कोर्ट जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे यांचे न्यायालयात दाखल होती.

Advertisement

सदर केसचे सुनावणी दरम्यान मा. सरकारी अभियोक्ता श्री नामदेव तरलगट्टी यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय मोगले यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट कामकाज पाहणारे हडपसर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे यांनी सदर गुन्हयातील सर्व भौतीक व दस्तऐवजी पुराव्यांचे सुयोग्य व नियोजनबध्दरित्या मांडणी करुन ते वेळचेवेळी मा. न्यायालयात हजर केले. त्याचप्रमाणे सदर केसचे सुनावणी दरम्यान केसमधील सर्व साक्षीदार व फिर्यादी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय मोगले यांनी ब्रिफकरुन दोषसिध्दीचे अनुषंगाने कौशल्यपुर्णरित्या प्रभावी प्रयत्न केले. त्यामुळे सदर केसचे सुनावणी अंती मा. न्यायालाने यातील आरोपीस दि.०७/०५/२०२६ रोजी शिक्षा देश सुनावले आहेत.

सदर केसमध्ये आरोपीस मा. जिल्हा व सत्रन्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी भा.दं. वि. क३०७ अन्वये दोषी ठरवुन त्यास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५०,०००/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावासाचे शिक्षादेश सुनावले आहेत. तसेच भादवी कलम ३२३ अन्वये शिक्षा पात्र गुन्हयासाठी तीन महीन्याचा साध्या कारावासाची शिक्षा व १००० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षादेश सुनावले आहेत.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-६, डॉ. सागर कवडे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे, यांचे मार्गदशनाखाली कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page