रावेत – बीआरटी रस्त्यावर भीषण अपघात; कारची तब्बल 12 दुचाकींना धडक

पिंपरी : पुणे जिल्ह्यात दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी रावेत बीआरटी रस्त्यावर एका कारने 12 दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.तसेच दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; रावेत येथील एका गॅरेज मध्ये एक कार दुरुस्तीसाठी आली होती. कार चालकाने कार चालविताना येत असणाऱ्या अडचणी मँकेनिकला सांगितल्या. त्यानंतर नक्की काय अडचण तसेच बिघाड आहे हे पाहण्यासाठी कार घेऊन रावेत बीआरटी मार्गावर मँकेनिक तपासणीसाठी गेला.

Advertisement

म्हस्के वस्ती येथे गेल्यानंतर अगोदरच नादुरुस्त असणाऱ्या कारचे ब्रेक लॉक झाले. त्यामुळे कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने समोरील आणि आजू बाजूच्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर पडले. काही जण किरकोळ जखमी झाले. मात्र यामध्ये दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच रावेत पोलीस घटनस्थळी दाखल झाले. अपघातात कारचेही नुकसान झाले. पोलिसांनी कारचालक आणि कारमधील असणाऱ्यांना ताब्यात घेतले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page