भाजपाला 400 जागांचे बहुमत मिळाले असते तर…; रमेश चेन्नीथला यांचं मोठं विधान

नाशिक : भारतीय जनता पक्ष व आरएसएस देशाला तोडू पहात आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे. भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीची उत्तर महाराष्ट्रातील तयारीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिला,शाळकरी मुलींवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. बदलापुरची घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासही विलंब लावला. महायुती सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकार विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page