सरकारची चिंता वाढली! मनोज जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण सुरु

जालना : मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अखेरचा इशारा देत जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. काल मध्यरात्री पासून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे. अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.

Advertisement

राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही”“

मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडे आहेत त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page