व्हॉट्सअॅपवर पोलिस आयुक्तांचा डीपी ठेवत फसवणूक; खुद्द अमितेशकुमार म्हणाले…

पुणे – पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे, शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा फोटो व्हाट्सएपच्या डीपीला लावत अनेकांना पैश्यांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा फोटो व्हाट्सअपला डीपी लावला. त्यावरून काही जणांना 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच ‘मी एका ठिकाणी अडकलो आहे. मी, अडचणीत आहे, मला विमान तिकीट बुक करायचे आहे’ यामुळे पैसे हवे आहेत असे म्हणत पैश्यांची मागणी केली आहे.
दरम्यान हा प्रकार काही वेळातच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना समजला. त्यांनी लागलीच त्यांच्या सोशल मीडिया व इतर प्लॅट फॉर्मवरून माझ्या फोटोचा वापर करून पैसे मागितले जात आहेत, या फसवणूकीपासून सावध होण्याचे नागरिक, नातेवाईक व मित्र परिवाराला आवाहन केले आहे. दरम्यान त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




