चालकानेच मालकाच्या आईचे सोन्याचे दागिने केले लंपास, पोलीसांनी हस्तगत केले १५ लाखाचे सोने..!

दिनांक २०/०४/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्यांचे घरातील आईचे सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे गु.र.नं. २२३/२०२६ भा.न्या.सं.क. ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांना तपास करण्याकरीता आदेशित केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे व लालु क-हे यांना फिर्यादी यांचे घरातील सोन्याचे दागिने त्यांचेकडे कामाला असलेला चालक यानेच चोरी केली असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे चालक नामे राजेश परशुराम कांबळे वय ४० वर्ष रा. कलवड वस्ती लोहगाव पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता दाखल गुन्हा त्याने केला असल्याचे कबुल केले. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये नमुद आरोपी याने चोरी केलेले १५,००,०००/- रु. किंमतीचे फिर्यादी यांचे दागिने वितळवुन तयार करुन घेतलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आलेली आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग (अतिरीक्त कार्य.) पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. शरद शेळके यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page