अंगणवाडीच्या आहारात आढळले चक्क बेडकाचे पिल्लू, पंढरपुरातील संतापजनक प्रकार

पंढरपूर : विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार पुरवला जात आहे. मात्र शालेय पोषण आहारात सातत्याने आळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे शासनाकडून निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान अशातच आता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील भुसे नगर अंगणवाडीमध्ये झिरो ते तीन वर्षाच्या बालकांना दिला जाणाऱ्या खाऊच्या पॅकिं मध्ये चक्क बेडकाचे पिल्लू आढळले. या प्रकाराने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांनी अंगणवाडीला भेट देऊन महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना कासेगाव येथील भुसे नगर अंगणवाडीमध्ये बोलवून त्या खाऊ पॅकिंगमध्ये आढळलेले बेडकाचे पिल्लू दाखविले. देशमुख यांनी अधिकाऱ्यांना त्याकंपनी विरोधात कडक कारवाई करावी, अशी सूचना केली. महिला व बालकल्याण अधिकारी नागणे यांनी पॅकिंगमध्ये जे बेडकाचे पिल्लू सापडले आहे, ते पॅकिंग आम्ही लॅबला पाठवून लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page