लोहियानगरमध्ये पोलिसांनी राबवली धडक अतिक्रमण मोहिम, अनधिकृत कट्टे व ओटे हटविले

पुणे – खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहियानगर व परिसरातील अवेध्य बांधकामे आणि अनधिकृत बांधलेले कट्टे व ओटे पोलिसांनी महापालिकेच्या पदतीने पाडले आहेत. मागील अनेक दिवसापासून परिसरात तणावाचे वातावरण आहे. काही समाजकंटक जातीय व धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी समाजकंटकांना इशाराच दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशन हद्दीत लोहियानगर व परिसरात अवैद्य बांधकामे व चौका चौकामध्ये ठेवण्यात आलेले बाकडे व अनधिकृतपणे बांधलेले कट्टे व ओटे यावर अनेक समाज कंटक सायंकाळच्या वेळी थांबून येणाऱ्या -जाणाऱ्या इसमांना व काही वेळा तर महिलांना त्रास होईल अशा पद्धतीने उभे राहत होते. तसेच ह्या समाज कंटकामध्ये काही जातीय किंवा धार्मिक अभिनिवेश उफाळून आल्यास त्यातून मोठी भांडण किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांचे बसण्याचे ठिकाण हटवणे गरजेचे होते.

खडक पोलीस स्टेशन येथे नव्याने हजर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांनी या अनुषंगाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी त्यासाठी महानगरपालिकेच्या अधिका-यांशी संपर्क केला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लोहीयानगर परिसरात गल्ली नं १ ते ४ व लोहीयानगर पोलीस चौकी ते लोहीयानगर कमान याभागात अतिक्रमण विरोधी कारवाई मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.

Advertisement

सदर मोहिमे दरम्यान पुढीलप्रमाणे वस्तू हटविण्यात आल्या

१) टप हातगाडी ०४, २) बिगर टप हातगाडी ०३. ३) काउंटर ०२, ४) शेड/झोपड्या ०६, ५) ईतर ०७, ६) नादुरुस्त रिक्षा ०१ तसेच काँक्रीट ओटे घण, पहारच्या सहाय्याने फोडण्यात आले. लोखंडी पत्रा शेड, स्टॉल गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आले. सदर वेळी पूर्णकाळ पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस तसेच पोलीस अधिकारी १) सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, २) सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार, ३) पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे व खडक पोलीस स्टेशन कडील १५ अंमलदार हजर होते.

तसेच महानगरपालिकेकडून क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, अतिक्रमण निरीक्षक राजेंद्र लोंढे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राठोड, व खैरनार व बिगारी सेवक २०, महाराष्ट्र सुरक्षा फोर्स ०६ व ४ टेंम्पो ट्रक होते. सदरची मोहीम यापुढेही अशीच चालू ठेवण्यात येणार असून अनधिकृत रीत्या अतिक्रमण केलेल्या इसमांनी त्यांची अतिक्रमणे वेळीच काढून न घेतल्यास त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने अतिक्रमणे काढून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान महानगरपालिकेकडून व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page