सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या निवडी जाहीर

वेळापूर (ता.माळशिरस ) : आज गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. पंडितजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनेते श्री.उत्तमराव जानकर साहेब (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. डॉ. धनंजय साठे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सोलापूर), युवानेते ऍड.पवन कुमार गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) व मा रजनीश बनसोडे (सरपंच वेळापूर, तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग माळशिरस) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार सोलापूर जिल्हयाच्या तालुका व जिल्हा पदाधिकारी निवडीचा व पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी खालील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोमनाथ तोरणे – जिल्हा उपाध्यक्ष आप्पा लोखंडे – जिल्हा सरचिटणीस, मनोज गायकवाड – मोहोळ तालुकाध्यक्ष, खंडू कांबळे सर -माढा तालुकाध्यक्ष, पोपट काळे- जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र दिल्यानंतर मा. श्री. उत्तमराव जानकर साहेब यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे पुरोगामी विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.धनंजय साठे यांनीही नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोहोळ युवक तालुकाध्यक्ष ॲड.विठोबा पुजारी,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष फैयाज शेख, मोहसीन शेख, सहदेव पाटोळे, इम्रान बागवान, महादेव कवटे, फारूख शेख, नवशाद मुलाणी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

जन हक्क टाइम्स पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page