दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; तोतया पोलिसांना अटक

पिंपरी : तोतया पोलिसांनी दोन तरुणांचे अपहरण करुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जांब येथे घडली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. योगेश विश्वास सावंत (३४, रा. राऊतनगर, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (२६, रा. मगरवस्ती खंडाळी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शुभम यशवंत कुलकर्णी (२१, रा. गायकवाडनगर, पुनावळे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी एक लाख ९० हजारांचा ऐवज मारहाण करून काढून घेतला. फिर्यादी यांना ३० ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे सोडून दिले. या घटनेचा समांतर तपास खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथककडून सुरू होता.

Advertisement

पोलिसांनी घटनास्थळ आणि टोलनाक्यावरील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील असल्याबाबत खात्री झाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक माळशिरस येथे रवानाकेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून ताब्यात घेतले. आरोर्षीकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन मोबाइल फोन असा एकूण ८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ज्ञानेश्वर घाडगे यांच्यावर वेळापूर पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच निष्पन्न आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत ॲट्रोसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page