पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली; धंगेकर की मोहोळ…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

पुण्यात यंदा ५३.५४ टक्के मतदान झालं आहे. ११ लाख ३ हजार ६७८ पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुण्यातल्या एकूण ६ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा पेठेत सर्वाधिक मतदान झालं आहे. कसबा पेठेमध्ये ५९.५४ टक्के मतदान झालं तर शिवाजी नगरमध्ये सगळ्यात कमी ५०.६७ टक्के मतदान झालं.

Advertisement

पुणे लोकसभेचं विधानसभा निहाय मतदान

वडगाव शेरी – 51.71%

शिवाजीनगर 50.67%

कोथरूड 52.43%

पर्वती 55.47%

पुणे कॅन्टोन्मेंट 53.13%

कसबा पेठ 59.24%

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ४१ हजार ८१७ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात १ लाख ४१ हजार 1३३, कोथरूड विधानसभा मतदारसंघात २ लाख १७ हजार ४५५, पर्वती विधानसभा मतदारसंघात १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात १ लाख ४९ हजार ९८४ तर कसबा पेठेत १ लाख ६४ हजार १०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page