36 तासांपासून बेपत्ता असलेले आमदार वनगा अखेर घरी परतले; पण..

मुंबई : महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांची पत्नी सुमन यांनी केली आहे.
श्रीनिवास वनगा हे गायब झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यानंतर काल मध्यरात्री तीनच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे घरी परतले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. यानंतर ते पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी चार पाच दिवसांनी घरी परतल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले. श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या 36 तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. तिकीट नाकारल्याने नाराज होऊन मागील 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांची संपर्क झाला आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.
श्रीनिवास वनगा 36 तास कुठे होते?
दरम्यान, शिंदे गटाकडून पालघर विधानसभेतून राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडावेळी आमदार श्रीनिवास वनगादेखील सूरत आणि गुवाहाटीला गेले होते. शिंदेंसोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. मात्र, श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलंय.
तिकीट मिळालं नाही म्हणून, वनगा हे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी माध्यमांसमोरच शिंदे यांच्यावर हल्ला करत उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत, त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा हे माध्यमांसमोर ढसाढसा रडले होते. यानंतर ते 36 तास गायब झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा कोणालाही पत्ता लागून न देता घरी आल्याचे सांगितले जाते. कुटुंबियांशी भेट घेऊन ते आता पुन्हा घराबाहेर पडले आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




